Paithan MIDC Police Station Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan Burglary | एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी; १.२६ लाखांचे दागिने लंपास

अमरापूर-वाघूडी येथे अज्ञात चोरट्यांकडून घरफोडी

पुढारी वृत्तसेवा

Housebreaking In Paithan MIDC

पैठण : पैठण तालुक्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरापूर-वाघूडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

माहितीनुसार, अमरापूर-वाघूडी येथील शेतकरी निवृत्ती मच्छिंद्र आदमाने यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्याचे नेकलेस, लहान बाळाचे दागिने, सोन्याचे मणी, पत्ता, झुंबर, दोन चैन-पट्ट्या तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी मच्छिंद्र निवृत्ती आदमाने यांनी बुधवारी (दि.१७) एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या या घरफोडीची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT