Sambhajinagar News : गुंठेवारीत घरांच्या बांधकामासाठी शून्य बेटरमेंट चार्जेस file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : गुंठेवारीत घरांच्या बांधकामासाठी शून्य बेटरमेंट चार्जेस

३०० चौ.मी. पर्यंतच्या मालमत्तांना लाभ, वाढीव बांधकामाला १.६० टक्क्यापर्यंत सवलत कायम; मनपाचे परिपत्रक

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News : Zero Betterment Charges for Construction of Houses in Gunthewari

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेने गुंठेवारीसाठी शुल्क सवलत लागू केली असून, यात १५ सप्टेंबरपर्यंत ५० टक्के शुल्कामध्ये सवलत राहणार आहे. असे असले तरी घराच्या बांधकामावर शून्य बेटरमेंट चार्ज आकारले जाणार आहे. महापालिकेने काढलेल्या परिपत्रकातच तसे नमूद आहे. त्यासोबतच वाढीव बांधकामाला एफएसआयसह १.६० टक्क्यापर्यंत सवलत कायम असेल. मात्र अतिरिक्त बांधकामाला रेहरिकनरच्या दराने १० टक्के दंड आकारून नियमित करणार आहे. पहिल्यांदाच ३०० चौरस मीटर अर्थात ३००० हजार चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामासाठी महापालिकने ही सवलत लागू केली आहे.

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी कायद्यान्चवे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने गुंठेवारी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार गुंठेवारी नियमितीकरण विकास योजना चालू ठेवण्यास १ मे ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहा महिन्याच्या मुदतवाढीला मान्यता देण्यात आली आहे. शहरातील सध्याच्या गुंठेवारी वसाहतींचे स्वरूप आणि गुंठेवारी नियमितीकरण योजना यांचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता गुंठेवारी योजना कायमस्वरूपी चालू न ठेवता ही मुदतवाढ संदर्भ क्रमांक ८ नुसार देण्यात आली आहे. त्यानुसार ही अंतिम मुदतवाढ ठरवून या कालावधीसाठी गुंठेवारी नियमितीकरणामधील विकास आकाराच्या शुल्कात सूट देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

खुल्या भूखंडाकरिता बेटस्मेंट शुल्क

शून्य ते ४५० चौरस मीटरपर्यंतच्या भूखंडासाठी १६ जुलै ते १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के सवलत आहे. त्यानंतर १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत २५ टक्के सवलत असेल. हे भूखंड अनधिकृत स्वरूपाची अभिन्यासामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच ४५० चौ. मी. ते ३९९२ चौ. मी. पर्यंतच्या भूखंडासाठी १५ सप्टेंबरपर्यंत ५० टक्के सवलत आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत २५ टक्के सवलत राहील. या भूखंडाच्या नियमितीकरणामध्ये किमान १० टक्के खुली जागेकरिता यूडीसीपीआरमधील विनियम क्रमांक ३.४.१ च्या तरतुदी लागू राहतील.

४५० चौरस मीटरच्या भूखंडासाठी ४.१३ लाख

४५० चौरस मीटर (४८७२ चौरस फूट) क्षेत्रफळाचा भूखंड नियमित करण्यासाठी आता पन्नास टक्के सवलत बेटरमेंट चार्जेसमध्ये दिली जाणार आहे. महापालिकेने बेटमेंट चार्ज १८३७ रुपये प्रतिचौरस मीटर असा आहे. ४५० चौरस मीटरचा भूखंड नियमित करण्यासाठी यापूर्वी ८ लाख २६ हजार ६५० रुपये लागत होते, मात्र आता ४ लाख १३ हजार ३२५ रुपये भरावे लागणार आहेत.

घरासाठी १०० टक्के सवलत

गुंठेवारी क्षेत्रातील ३०० चौरस मीटर (३२२८ चौरस फूट) क्षेत्राफळापर्यतच्या घराला किंवा कोणत्याही बांधकामाला नियमितीकरणाच्या प्रक्रियेत बेटरमेंट चार्जेसमध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे. हे बांधकाम नियमानुसार करण्यात आले असेल तर बेटमेंट चार्जेस न भरता ते नियमित करता येणार आहे. जास्तीचे बांधकाम असेल तर त्या त्या भागातील रेडरिकनर दराच्या दहा टक्के रक्कम दंडाच्या स्वरूपात भरणा करून बांधकाम नियमित करता येणार,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT