Sambhajinagar Accident News : दुचाकी झाडावर आदळून तरुण ठार File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Accident News : दुचाकी झाडावर आदळून तरुण ठार

रस्त्याचे काम सुरू असलेल्या मार्गावरून दुचाकी घसरून थेट झाडावर आदळल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Youth killed after bike hits tree

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रस्त्याचे काम सुरू असलेल्या मार्गावरून दुचाकी घसरून थेट झाडावर आदळल्याने एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि.११) दुपारी घडली. पैठण रोड ते लिंक रोडदरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थान परिसरात हा अपघात झाला. संदीप रमेश पतंगे (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे.

संदीप हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील येळंब येथील रहिवासी होते. गेल्या काही महिन्यांपासून ते नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले होते. सध्या ते संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील शिवनगर भागात वास्तव्यास होते.

बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास संदीप दुचाकीवरून लिंक रोडने पैठण रोडच्या दिशेने जात होते. यावेळी रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली.

या भीषण अपघातात संदीप यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT