Loan fraud: कर्ज प्रकरणात साडेपाच लाखांची फसवणूक file photo
छत्रपती संभाजीनगर

Loan Fraud : कर्ज मंजुरीचे आमिष दाखवत शिक्षकाची २ लाखांवर फसवणूक

कोरे चेक, नोटरी व महत्त्वातची कागदपत्रे घेतली-

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Teacher defrauded of over ₹2 lakh with the lure of loan approval

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा बँकेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका शिक्षकाकडून तब्बल २ लाख ३ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गंगाखेड येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे कर्ज प्रक्रियेसाठी असल्याचे आवश्यक सांगत आरोपीने शिक्षकाकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, पगाराची स्लिप, कोरे धनादेश तसेच नोटरी बॉण्डही घेतले होते. पैसे व कागदपत्रे परत मागितल्यावर उलट धमकी दिल्याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालू पेमा राठोड (वय ५३) हे वाघदरा तांडा, ता. गंगाखेड येथील असून सध्या व्यंकटेश नगर, गंगाखेड येथे वास्तव्यास आहेत. ते शंकरवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून आहेत. त्यांच्या नावे भारतीय स्टेट बँकेचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन राजकुमार रमेश गायकवाड (रा. ठाकूर कॉलनी, गंगाखेड) याने दिले होते.

२२ मे रोजी आरोपीने कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असल्याचे सांगून शिक्षक राठोड यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, पगाराची स्लिप, तीन कोरे चेक, दोन नोटरी बॉण्ड आणि दोन कोरे बॉण्ड घेतले. त्यानंतर कर्ज मंजुरीसाठी विविध खर्च, प्रक्रिया शुल्क व इतर कारणे पुढे करत वेळोवेळी रोख रक्कम तसेच फोन-पेच्या माध्यमातून एकूण २ लाख ३ हजार रुपये स्वीकारले. मात्र, एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही आरोपीने कर्ज मंजुरीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. वारंवार विचारणा करूनही तो उडवाउडवीची उत्तरे देत राहिला.

अखेर संशय बळावल्याने राठोड यांनी आपले पैसे आणि कागदपत्रे परत मागितली. त्यावेळी आरोपीने पैसे किंवा कागदपत्रे परत करण्यास नकार देत तुझ्याच्याने काय होतं ते कर असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली. याशिवाय, स्वतःकडे असलेल्या कोऱ्या चेकचा गैरवापर करून ते बाऊन्स दाखवत तुझ्याविरोधातच गुन्हा दाखल करीन, अशी धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे शिक्षक राठोड यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर त्यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून राजकुमार रमेश गायकवाड याच्याविरुद्ध फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी होत आहे. आरोपीने इतर व्यक्तींनाही अशाच प्रकारे गंडा घातला आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात असल्याची

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT