Property Tax Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Property Tax : शहरात १.३३ लाख मालमत्तांना केवळ १२०० रुपयांपर्यंतच कर

मनपा कर्मचाऱ्यांच्या तपासणीत उघड, जुन्या वसाहतींचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News : Tax on 1.33 lakh properties in city up to Rs.1200 only

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मागील दोन दशकांमध्ये मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे शहरातील जुन्या वसाहतीत मोडणाऱ्या अनेक नव्या बांधकामांना जुनेच मालमत्ता कर आकारले जात असून, यात १ लाख ३३ हजार मालमत्तांना सुमारे १२०० रुपयांपर्यंत कर आकरणी होत असल्याची माहिती तपासणीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळली आहे.

महापालिकेची स्थापना १९८२ साली झाली तर पहिली निवडणूक १९८८ साली झाल्यानंतर महापौर व पदाधिकारी यांची नियुक्ती झाली. त्यानंतर मालमत्ता कर संकलन व मूल्यांकन विभागाकडून मालमत्ताधारकांनी कर आकारणी पुनर्मूल्यांकन झालेले नाही. त्यामुळे केली जात आहे. सध्या मालमत्ताधारकांची ३ लाख २२ हजार नोंदणी आहे.

या मालमत्ताधारकांकडे थकीत कराची रक्कम ८०० कोटी रुपये इतकी असून, या वर्षाची मागणी १६२ कोटी रुपये इतकी आहे. थकीत ८०० कोटींमध्ये दुबार कर आकारणीच मध्ये मार देता नोंद असून, त्यांच्याकडे २०० कोटी आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीकडे अधिक लक्ष दिले जात असून, त्यासाठी दहा झोनमध्ये १४० कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

नुकताच सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यावेळी प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या १ लाख ३३ हजार मालमत्ताधारकांना केवळ १२०० रुपयांपर्यंत कर ८ आकारणी झालेली असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे दृष्टीने कितीही प्रयत्न केले तरी या जुन्या मालमत्ताधारकांना कर मूल्यांकन होत नाही, तोपर्यंत नव्याने कर आकारणी करता येणार नसल्याने त्यांच्याकडून केवळ २० ते २स कोटी रुपये कराचे उत्पन्न मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले

एसआयआरमुळे वसुलीला ब्रेक

मनपाच्या दहा झोनमध्ये कर आकारणी करून त्याच्या वसुलीसाठी १४० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु सध्या या कर्मचाऱ्यांकडे एसआयआरच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे कर्मचारी बीएलाओंना सहायक कर्मचारी म्हणून नियुक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कर वसुलीच्या कामाला ब्रेक लागला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT