Sambhajinagar News : बुडालेल्या युवकाच्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : बुडालेल्या युवकाच्या मित्रांची पोलिसांकडून चौकशी

युवकाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी सोमवारी त्याच्या मित्रांची चौकशी केली.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Police question friends of drowned youth

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : दौलताबाद येथील केसापुरी शिवारातील धबधब्याच्या पाण्यात बुडून प्रथमेश शांतिलाल गायकवाड (२१, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) या युवकाचा रविवारी (दि.५) मृत्यू झाला होता. युवकाच्या मृत्यूप्रकरणी नातेवाइकांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी सोमवारी त्याच्या मित्रांची चौकशी केली.

रविवारी सुटीचा दिवस असल्याने प्रथमेश पाच, सहा मित्रांसोबत केसापुरी येथील धबधबा पाहण्यासाठी आला होता. सर्व मित्रांनी खाली धबधब्यात पाण्याचा आनंद घेतला. प्रथमेश हा डोंगरावर चढला. वर चढून साचलेल्या पाण्यात त्याने उडी मारल्यानंतर तो पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले. मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात पर्यटनासाठी आलेल्या काही युवकांनी प्रथमेशला पाण्याबाहेर काढले. मात्र त्याचा जीव वाचवता आला नाही. प्रथमेश हा दोन दगडाच्या कपारीत अडकला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रथमेशच्या नातेवाइकांनी त्याला मारहाण करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. सोमवारी सकाळी सुमारे १० वाजता दौलताबाद पोलिस ठाण्यात प्रथमेशच्या मित्रांना बोलावून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना सर्व मित्रांनी एकसारखी उत्तरे दिल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, प्रथमेश याने मागील वर्षी दहावी उत्तीर्ण केली होती. यावर्षी येवला तालुक्यातील एका अकादमीत प्रवेश घेण्यासाठी त्याच्या कुटुंबाने २५ हजार रुपये व्याजाने उधार घेऊन प्रवेश शुल्क भरल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलिस स्टेशनमध्ये नोंद घेऊन अधिक तपास दौलताबाद पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT