Sambhajinagar News : १३ थकबाकीदारांची मनपाकडून मालमत्ता सील file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : १३ थकबाकीदारांची मनपाकडून मालमत्ता सील

४२.७६ लाखांचा मालमत्ता कर वसूल

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Municipal Corporation seals properties of 13 defaulters

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी (दि. १५) शहरातील नऊ झोनमध्ये राबविण्यात आलेल्या कारवाईत १३ मालमत्ता सील करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान थकबाकीदारांकडून ४२.७६ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केल्याची माहिती महापालिकेने दिली. यापुढे दर गुरुवार आणि शुक्रवारी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार सर्व झोन कार्यालयांनी ही मोहीम राबविली. या मोहिमेत झोन एकमध्ये दोन मालमत्ता सील करून एका मालमत्ताधारकाकडून १.५० लाख रुपये वसूल करण्यात आले.

झोन दोनमध्ये दोन मालमत्ताधारकांकडून ४.८२ लाख, झोन तीनमध्ये एका मालमत्ताधारकाकडून १.२८ लाख आणि झोन चारमध्ये एका मालमत्ताधारकाकडून ३.५६ लाख रुपये वसूल केले. झोन पाचमध्ये तीन मालमत्ता सील करून दोन मालमत्ताधारकांकडून ३.४० लाख, तर झोन सहामध्ये एक मालमत्ता सील करण्यात आली. झोन सातमध्ये एक मालमत्ता सील करून दोन मालमत्ताधारकांकडून ६.७४ लाख रुपये, तर झोन आठमध्ये तीन मालमत्ता सील करण्यात आल्या. झोन नऊमध्ये चार मालमत्ताधारकांकडून १.६१ लाख रुपये वसूल करण्यात आले.

निवासी मालमत्तांवरही कारवाईचा इशारा

थकीत मालमत्ता कर तातडीने भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले आहे. निवासी मालमत्तेतील एक खोली तसेच इतर स्थावर व जंगम मालमत्ताही सील करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT