Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेट Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar news : मनपा कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

लेखा विभागातील कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन : दोषींवर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Municipal Corporation employees work wearing black armbands

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यावर ठेकेदाराकडून झालेल्या कथित मारहाण व शिवीगाळ प्रकरणाच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.२१) मनपा लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती व असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली असून, तो कर्मचारी दैनंदिन कामकाज करत असताना संबंधित ठेकेदाराने बिलाच्या फाईलबाबत विचारणा करत शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

याप्रकरणी माहितीनुसार, मिळालेल्या मंगळवारी (दि.१९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास मनपा ठेकेदार मुबारक मेहबूब पठाण हे लेखा विभागात आले होते. बिलासंदर्भातील फाईलवरून त्यांनी लिपिक अभिषेक ढेकळे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर ढेकळे यांच्या तोंडात चापट मारून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी मनपातील सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. त्यानंतर कर्मचारी प्रतिनिधींनी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

संबंधित ठेकेदाराविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा. तसेच त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली. आयुक्तांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत संबंधिताविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष संजय रगडे, लेखाधिकारी संजय कोलते, महेश दुबे, काम्रान फरहाद, तीर्थराज धोपे, अजय दिडोरे, सतीश सौर, अविनाश निकम, जितेंद्र खराडकर आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

पुन्हा घटना घडल्यास आंदोलनाचा इशारा

या घटनेनंतर मनपा कर्मचारी संघटनांमध्ये नाराजी पसरली असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची हमी द्यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली असून, पुन्हा अशी घटना घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT