Sambhajinagar News : दुष्काळामुळे शेतकरी जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ farmer file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दुष्काळामुळे शेतकरी जीवन संपवण्याच्या घटनांमध्ये वाढ

विभागीय प्रशासन गाफील, चक्क महिनाभरानंतर घेतला जातो आढावा

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Increase in incidents of farmers ending their lives due to drought

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात दुष्काळीची दाहकता वाढत आहे. पावसाच्या खंडामुळे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः करपल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

याच विवंचनेतून सध्या विभागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून ४ दिवसांतच ८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. परंतु, असे असले तरी जिल्हा व विभागीय प्रशासनाकडून या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केले जात असून तब्बल महिनाभरानंतर आत्महत्यांचा आढावा घेतला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मराठवाड्यात यंदा मान्सूनच्या १२० दिवसांपैकी तब्बल ७० दिवस पावसाचा खंड राहिला आहे. जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी हजेरी लावली. परतु, या दोन महिन्यांतही खंडकाळ अधिकप्रमाणात राहिला. तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचे प्रत्येकी चार दिवस वगळता संपूर्ण महिना कोरडाच गेला आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. विभागातील नांदेड वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाची स्थिती चिंताजनक आहे. हडाचे पाणी करून पेरणी केली. पीक वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु, निसर्गापुढे शेतकरी हरला.

सध्या याच संकटामुळे विभागात शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या चार दिवसच विभागातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांतील आठ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वहकारीत जीवनयात्रा संपवली आहे. एकीकडे शेतकरी आपला जीव गमावत आहे. तर दुसरीकडे मात्र प्रशासनाला या आत्महत्यांचे गांभीर्यच नसल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाकडे शेतकरी आत्महत्यांचे दैनंदिन अहवालच प्राप्त होत नाही.

एवढेच काय तर विभागीय आयुक्तालयालादेखील ही माहिती महिनाभरानंतरच प्राप्त होते. तहसील कार्यालयांकडून दैनंदिन माहिती उपलब्धच करून दिली जात नसल्याने शेतकरी आत्महत्येबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हेच यातून दिसत आहे.

दैनंदिन माहिती तहसीलकडेच जिल्ह्यात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांची माहिती तहसील कार्यालयांकडे उपलब्ध असते. जिल्हा प्रशासनाकडे केवळ अनुदानासाठीचे प्रस्ताव दाखल होत असतात. त्यामुळे दैनंदिन माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नसते.
- संजय शिंदे, नायब तहसीलदार, गृहशाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT