Sambhajinagar Crime News : मिटमिटा भागात घर फोडून २.८० लाखांची रोकड अन् ३ तोळे सोने लंपास file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : मिटमिटा भागात घर फोडून २.८० लाखांची रोकड अन् ३ तोळे सोने लंपास

नवीन व्यवसायाचे नियोजन सुरू असल्याने कुटुंबीयांसह मूळ गावी गेलेल्या एका स्विगी डिलिव्हरी बॉयचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल २ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि ३ तोळे सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: House broken into in Mitmita area; Rs 2.80 lakh in cash and 3 tolas of gold stolen

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन व्यवसायाचे नियोजन सुरू असल्याने कुटुंबीयांसह मूळ गावी गेलेल्या एका स्विगी डिलिव्हरी बॉयचे बंद घर फोडून चोरट्यांनी कपाटातील तब्बल २ लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि ३ तोळे सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान मिटमिटा भागातील ग्रीन सिटी फेज येथे घडली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सईदउर रहेमान मुनीर सय्यद (३१, रा. गट नं. १२३, प्लॉट नं. ४२, ग्रीन सिटी फेज, मिटमिटा; मूळ रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) याच्या तक्रारीनुसार, ते गेल्या दोन वर्षांपासून शहरात स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ते आईच्या नावावर असलेल्या मिटमिटा येथील घरात पत्नी, भाऊ आणि दोन मुलींसह वास्तव्यास आहेत.

सध्या नवीन व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन सुरू असल्याने गेल्या दीड महिन्यांपासून दोघे भाऊ मिटमिटा येथील घरी कमी कालावधीसाठी येत-जात होते. शनिवारी (दि. १७) सकाळी त्यांचा भाऊ अतिक उर रहेमान हा मिटमिटा येथील घरी आला व एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी मूळ गावी धोंदलगाव येथे गेला.

दरम्यान, मंगळवारी (दि. २०) सकाळी सात वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या अन्सार शेख यांनी फोन करून, तुमच्या घराचा कडीकोयंडा तोडून आत चोरी झाली आहे, अशी माहिती दिली. माहिती मिळताच सईदउर रहेमान यांनी तातडीने पत्नीसह मिटमिटा येथे धाव घेतली. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाट उचकटून आतील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. व्यवसायासाठी घरात ठेवलेले २ लाख ८० हजार रुपये कानातील झुमके व लटकन (अंदाजे २ तोळे) आणि ५-५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ऐवज लंपास केल्याचे समोर आले. पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यकांत शेमळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT