aeroplane airplane Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कनेक्टिव्हिटीवरून उद्योजक नाराज

उद्योगविषयक प्रश्नांवर सीएमआयएची बैठक, शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Entrepreneurs upset over connectivity

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कोणत्याही प्रदेशात नवीन औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी आणि मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असतात. छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रदेशात औद्योगिक गुंतवणुकीची मोठी क्षमता असली तरी हवाई, रेल्वे आणि रस्ते कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होणे गरजेचे आहे. मात्र या बाबतीत पाठपुरावा करूनही अपेक्षित गतीने प्रगती होत नसल्याबद्दल उद्य ोजकांनी नाराजीही व्यक्त केली.

येथील चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) तर्फे उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर बुधवारी (दि.११) सीएमआयए कार्यालयात बैठक घेण्यात आली. यात उद्योग क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्नांवर सीएमआयए कार्यालयात बैठक घेण्यात आली.

सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माच्छर, उपाध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव मिहीर सौन्दलगेकर, खजिनदार सौरभ छल्लाणी, ऋषिकेश जाजू, ऋऋषिकेश गवळी, सीए सोहम कोटक, मोदानी, अनिकेत पाटील आणि रवींद्र मानवतकर उपस्थित होते.

यावेळी सीएमआयएच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, संभाजीनगर येथून अधिक शहरांशी हवाई संपर्क वाढविणे, मनमाड-छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचे डबलिंग, पुणे-छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारणा, शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा, मोबाईल नेटवर्क समस्या तसेच औद्योगिक वीजदरवाढ आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध कायदा-सुव्यवस्था व पायाभूत सुविधा संबंधित प्रश्न याबाबतही सीएमआयएने सक्रिय भूमिका घेतली आहे. मात्र शासन, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

गॅस टंचाईचा उद्योगांसमोर धोका

उद्योगांसमोर उभ्या राहिलेल्या एलएनजी आणि एलपीजी गॅस पुरवठा समस्येचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे उद्योगांवर गंभीर परिणाम होण्याचा धोकाही उद्योजकांनी व्यक्त केला. यावर केंद्र व राज्य सरकारकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी सीएमआयएकडून करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT