पाणीपुरवठा थांबविण्याचा जलसंपदा विभागाचा संभाजीनगर मनपाला इशारा

जायकवाडी धरणातील नाथसागरातून शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या देयकांबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कडक इशारा दिला आहे.
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

Sambhajinagar Water Resources Department warns of stopping water supply

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणातील नाथसागरातून शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या देयकांबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेला कडक इशारा दिला आहे. प्रलंबित पाणीपट्टीसह चालू देयकाची रक्कम तातडीने अदा करावी, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस जलसंपदा विभागाने मनपाला बजावली आहे.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Pune News: पुण्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर, धरणातील पाणीसाठा इतका टक्के झाल्यावर देणार पहिला इशारा

शहराचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत जायकवाडी धरण असून, या जलसाठ्यातून महापालिका पाणी उचलते. या पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाने निश्चित केले असून, त्या बदल्यात महापालिकेला दरमहा पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही काळापासून ही रक्कम नियमित न भरल्याने थकबाकीचा डोंगर वाढला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्यात थकीत रक्कम वसुलीसाठी जलसंपदा विभागाने ही नोटीस पाठवली आहे.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Pune News: पुण्यातील पूरस्थिती टाळण्यासाठी जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर, धरणातील पाणीसाठा इतका टक्के झाल्यावर देणार पहिला इशारा

याबाबत माहिती देताना महापालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत जलसंपदा विभागाला १० कोटी ५८ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. तसेच चालू आर्थिक वर्षातही आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख रुपये भरले आहेत. जलसंपदा विभागाच्या इशाऱ्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news