Sambhajinagar News: 99 thousand eligible persons from 1,276 villages in the district
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत छत्रपती संभाजीनगरमध्ये १ हजार २७६ गावांतील ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे. ही संख्या आणखी वाढणार असून शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरणसह अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव केले आहे.
या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण ९९ हजार ६४८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या-त्या बँक शाखांसह कार्यकारी सेवा. सहकारी संस्था, सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयासोबतच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.
योजनेचा लाभमिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा, सीएससी केंद्रात आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी विलंब न करता आधार प्रमाणिकरण तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनांतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधा संलग्नीकरण आणि प्रमाणीकरणसह अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण होताच लाभ मिळणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या संख्येत आणखी वाढल होणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.