Sambhajinagar News : जुन्या शहरातील ३९ इमारती धोकादायक, मनपाकडून कारवाई सुरू file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : जुन्या शहरातील ३९ इमारती धोकादायक, मनपाकडून कारवाई सुरू

स्ट्रक्चरल ऑडिट अनिवार्य : अहवाल सादर न करणाऱ्या रहिवाशांना हलविणार सुरक्षितस्थळी

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: 39 buildings in the old city are dangerous; Municipal Corporation initiates action

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारतींचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने केलेल्या पाहणीत जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील तब्बल ३९ इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या इमारतींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यात स्ट्रक्चरल ऑडिटअनिवार्य असून, अहवाल सादर न करणाऱ्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. जुलैच्या प्रारंभी सादर झालेल्या अहवालात ३९ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्व इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असून, स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेचा अहवाल सादर करणाऱ्या इमारतींनाच वापराची परवानगी दिली जाणार आहे.

ज्या मालकांनी ऑडिट अहवाल सादर केला नाही, त्या इमारतींमधील रहिवाशांना पोलिस बंदोबस्तात सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जीर्ण इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी धोकादायक इमारतींवरील कारवाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

पोलिस बंदोबस्तात स्थलातर करणार

शहरातील सर्व धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले असून, स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षिततेचा अहवाल सादर करणाऱ्या इमारतींनाच वापराची परवानगी दिली जाणार आहे. ज्या मालकांनी ऑडिट अहवाल सादर केला नाही, त्या इमारतींमधील रहिवाशांना पोलिस बंदोबस्तात सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT