Sambhajinagar News : वन अधिकाऱ्याच्या गाडीतून पिस्तूलसह १५ काडतुसे चोरीला file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वन अधिकाऱ्याच्या गाडीतून पिस्तूलसह १५ काडतुसे चोरीला

प्रोझोन मॉलबाहेर घडलेल्या धाडसी चोरीने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News : 15 cartridges along with a pistol were stolen from a forest officer's car

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गजबजलेल्या प्रोझोन मॉलसमोर भरदिवसा एका वन अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी शासकीय सर्व्हिस पिस्तूल (९ एमएम), १५ जिवंत काडतुसे आणि शासकीय गणवेश असलेली सुटकेस पळवून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी चंद्रकांत गोपाळराव पोतुलवार (४२, रा. काठेवाडी, देगलूर) हे बोधडी येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी त्यांच्या इनोव्हा कारने (एमएच-२४-एटी-६८१७) हायकोर्टातील एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. हायकोर्टाचे कामकाज आटोपून सायंकाळी ४:४० वाजेच्या सुमारास ते त्यांचे मामा रवींद्र सूर्यकांतराव पेरगुलवार यांच्यासोबत प्रोझोन मॉल येथे गेले होते.

त्यांचा चालक विठ्ठल दुधकवडे (रा. मंगनाळी, कंधार) याने मॉलच्या गेटवर अधिकाऱ्यांना सोडले आणि गाडी मॉलच्या समोर पार्क केली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चालक लघुशंकेसाठी मॉलमध्ये गेला. तो परत आल्यावर त्याला गाडीच्या डाव्या बाजूची मागील काच फोडलेली दिसली. त्याने तात्काळ अधिकाऱ्याला याची माहिती दिली.

पोलिसांची उडाली झोप

चोरट्यांनी भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी गाडीची काच फोडून थेट शासकीय पिस्तूल आणि काडतुसे लांबवल्याने पोलिसांची झोप उडाली.

सुटकेसमध्ये होते पिस्तूल आणि काडतुसे

पोतुलवार यांनी तातडीने गाडीजवळ धाव घेऊन पाहणी केली असता, गाडीतील त्यांची लॉक केलेली सुटकेस गायब असल्याचे निदर्शनास आले. या सुटकेसमध्ये त्यांचे ९ एमएम शासकीय सर्व्हिस पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे, 'महाराष्ट्र वन सेवा' असा बॅच आणि तीन स्टार असलेला शासकीय गणवेश (नेमप्लेटसह), लाल बेल्ट आणि इतर काही साधे कपडे असा संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्देमाल होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT