Sambhajinagar New Water Supply Scheme
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. मात्र, नक्षत्रवाडी एमबीआर ते जलकुंभापर्यंतच्या जलवाहिनींची जोडणी व जलशुद्धीकरण केंद्राचे काम अजूनही अपूर्णच आहे. असे असतानाही महापालिकेने आतेताईपणा करीत नक्षत्रवाडी आणि जायकवाडीतील पंपगृहासाठी उच्चदाबाचे वीज कनेक्शन घेत त्यातून पाणी चाचणीसाठी वीज पुरवठा घेतला. त्यामुळे महापालिकेला दोन महिन्यांत वीज बिलापोटी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहराला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत योजनेतून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना टाकण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या पूर्वीपासूनच हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, अद्यापही हा अंतिम टप्पा पूर्ण करण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका आणि उच्चाधिकार समितीला यश आलेले नाही. मागील सहा महिन्यांपासून कामाची स्थिती जैसे थेच आहे. अजूनही नक्षत्रवाडी एमबीआर ते जलकुंभ यादरम्यानच्या जलवाहिन्यांचे काम पूर्ण झालेले नाही.
अनेक एआय ईमेज ठिकाणी जलवाहिन्यांवर मोठमोठे गॅप जोडण्याचे काम शिल्लक आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्राचे कामही अपूर्णच आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच कंत्राटदार कंपनीला पेसोचे प्रमाणपत्र मिळेल.
दरम्यान, हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच जलवाहिनीतून शहरापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. हे महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यानंतरच जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडीदरम्यान टाकण्यात आलेल्या जलवाहिनीतून पाणी चाचणी घेणे आवश्यक होते. परंतु, अर्धवट कामाच्या जोरावरच देय एकूण रक्कम : ₹१,१०,००,०००/- शेखचिल्लीप्रमाणे शहरात पाणी आणण्याचे दिव्यस्वप्न दाखविण्यात आले.
अन् त्यातूनच आ-तेताईपणा करीत महापालिकेने नक्षत्रवाडी व जायकवाडीतील पंपगृहासाठी उच्चदाबाची वीज जोडणी घेतली. अन् त्याच जोडणीतून वीज पुरवठा घेत जलवाहिनीतून पाणी चाचणी देखील घेतली. या चाचणीमुळे मागील दोन महिन्यांत महापालिकेला १ कोटी १० लाख रुपये वीज बिलापोटी भरणा करावा लागला. त्यामुळे एक लिटर पाणीही आले नाही अन् वीज बिल गेले कोटीवर, अशी म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली.
नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणी आल्यानंतरही तेथून पुढे पाणी नेण्याकरिता, जी कामे पूर्ण होणे आवश्यक होती. चार महिन्यांपासून जैसे थेच असतानाही प्रशासनाने जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यानच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी चाचणीसाठी घाई का केली. या घाईमुळेच आता प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत महापालिकेला वीज बिलापोटी दरमहा ६० लाखांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
पहिल्याच महिन्यात ७८ लाख
नवीन पाणी पुरवठा योजना फेब्रुवारी-मार्च महिन्यात उच्चदाब वीज जोडणीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर या जोडणीतून जायकवाडी धरणाच्या जॅकवेलवरील पंपांना वीजपुरवठा घेतला. पहिल्याच महिन्यात ७८ लाखांचे वीज बिल आले. त्यानंतर भार कमी करण्यासाठी महापालिकेने पत्र दिल्याने दुसऱ्या महिन्यात ३५ लाख रुपये बिल आले असून आता पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत ३० ते ३५ लाख रुपयांचे वीज बिल येईल, असे सूत्रांनी सांगितले.