Ganeshotsav Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी मनपा सज्ज

मिरवणूक मार्गाची डागडुजी सुरू : विसर्जन विहिरींची स्वच्छता

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Municipality ready for Ganeshotsav

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारीला वेग दिला असून, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे, पॅचवर्क, गणेश मंडळांच्या मंडपांना परवानगी आणि विसर्जनस्थळांवरील सुविधांचा गुरुवारी (दि. ३) आढावा घेण्यात आला. यात विसर्जन विहिरींची स्वच्छता व गाळ काढण्यासोबतच आवश्यक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारणे आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल, मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग दिला असून गुरुवारी मनपा पदाधिकाऱ्यांकडून यांसदर्भातील आढावा घेण्यात आला. यावेळी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविणे आणि पॅचवर्कची कामे सुरू असताना वार्ड अभियंत्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करावी. कामाचा दर्जा तपासल्यानंतरच काम पूर्ण झाल्याचे प्रमाणित करावे, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

तसेच गणेशोत्सवाशी संबंधित कामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. यासह मिरवणूक मार्ग, मंडप परवानगी, विसर्जन व्यवस्था, स्वच्छता आणि प्रकाशयोजनेत कोणतीही त्रुटी राहू नये. नागरिक तसेच गणेश मंडळांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे पूर्ण करावीत, असे आयुक्त अमोल

येडगे यांनी स्पष्ट केले. यावेळी विसर्जन विहिरींची स्वच्छता गाळ काढण्याच्या कामासोबतच उपलब्ध कृत्रिम विसर्ज तलावांची पाहणी करण्यात आली. गरज असलेल्या नवी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबतही कार्यवाह करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासह विसर्जनस्थळ वीजपुरवठा खंडित झाल्यास कामकाज ठप्प होऊ नये, यासाठ जनरेटर उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोब विसर्जनस्थळी पुरेशी प्रकाशयोजना करण्याचे आले.

मंडप परवानगीसाठी एक खिडकी

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी लागणाऱ्या तात्पुरत्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात, यासाठी सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. परवानगी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून मंडळांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT