Sambhajinagar Municipal Corporation rakes in huge revenue from tax collection.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने यंदा मालमत्ता करासह पाणीपट्टीची रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे. आतापर्यंत पावणेदोनशे कोटींपर्यंतच कर वसुली झाली आहे. मात्र ९ महिन्यांत म्हणजे डिसेंबरअखेर कर वसुलीचा आकडा २०० कोटी पार गेला आहे. महापालिका निवडणुकीचाही कर वसुलीला हातभार लागला असून, निवडणुकीच्या रि-गणात उतरणाऱ्या इच्छुकांनी दहा दिवसांत ३ कोटी ५० लाखांहून अधिकचा कर भरणा करून बेबाकी घेतली आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय यंत्रणांची तयारी सुरू आहे. त्यासोबतच दहा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय सारत वर्षांपासून निवडणूक रिं उतरण्याच्या गणात प्रतीक्षेत असलेले इच्छुकही आवश्यक कागदपत्रांसह सज्ज झाले आहेत. अनेकांनी यापूर्वीही महापालिका निवडणूक लढलेली असल्याने त्यांनी सर्वप्रथम महापालिकेचा सर्व थकित मालमत्ता आणि पाणीपट्टी कर भरणा करून बेबाकीसाठी प्रक्रिया केली होती.
तर काहींनी निवडणुका जाहीर होताच प्रमाणपत्र, कर भरणा करून उमेदवारी दाखल करण्यावर भर दिला. त्यामुळे महापालिकेच्या तिज-पेरीत आतापर्यंत साडेतीन कोटी रुपये जमा झाल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
महापालिकेची निवडणूक विविध कारणांमुळे लांबणीवर पडली होती. त्यामुळे तब्बल १० वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. अर्ज घेणाऱ्यांची संख्या पाच हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने निवडणूक महापालिकेला पावली आहे.
४०० कोटी वसुलीचे टार्गेट
महापालिकेची शहरात शेकडो कोटींची कराची थकबाकी असली तरी दीडशे ते पावणेदोनशे कोटींची वसुली होते. यंदा ९ महिन्यांतच कर वसुली २०० कोटींवर गेली असून, ३१ मार्चपर्यंत वसुलीचा आकडा ४०० कोटींवर नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही जी. श्रीकांत यांनी सांगितले.