Sambhajinagar News : परिमंडलात दीड लाखापेक्षाही जास्त टीओडी मीटर  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : परिमंडलात दीड लाखापेक्षाही जास्त टीओडी मीटर

महावितरणकडून मीटर बदलण्याच्या कामाचा वेग वाढला

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar More than 1.5 lakh TOD meters in the area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महावितरण वीज चोरी आणि परफेक्ट बिलांचा दावा करत घरगुतीसह इतर ग्राहकांना टीओडी (टाईम ऑफ डे) मीटर बसवत आहे. आजघडीला परिमंडलात सुमारे दीड लाखापेक्षाही जास्त ग्राहकांना हे मीटर बसवून देण्यात आले आहेत. मीटर बदलण्याच्या कामाला महावितरणने वेग दिला आहे.

वाढती वीज चोरी आणि बिलांतील घोळ दूर करण्यासाठी अत्याधुनिक असे टीओडी मीटर बसवण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला आहे. दरम्यान, या मीटरला नागरिकांचा मोठा विरोध आहे. विरोध असूनही हे मीटर बदलण्याचे काम सुरूच आहे. आतापर्यंत घरगुती ग्राहकांना दीड लाख मीटर बसवले आहेत. व्यावसायिक तसेच औद्योगिक ग्रहकांनाही हे मीटर बसवण्यात आले असून, याची संख्या मोठी आहे. हे मीटर सर्वच ग्राहकांना द्यायचे आहेत. त्यामुळे मीटर बदलण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

१ जुलैपासून सवलत लागू

१ जुलै २०२५ पासून टीओडी मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वापरलेल्या विजेवर टीओडी सवलत लागू झाली आहे. टीओडी मीटर बसवलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील १ लाख ४७ हजार २२० घरगुती ग्राहकांना जुलै व ऑगस्ट महिन्यात ही सवलत वीज बिलात मिळाल्याचा दावा महावितरणने केला आहे.

ग्राहकांना पाच वर्षांसाठी सवलत

महावितरणकडून २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी घरगुती ग्राहकांसाठी टाईम ऑफ डे (टीओडी) नुसार स्वस्त वीज दराचा प्रस्ताव आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार आयोगाने घरगुती ग्राहकांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत मंजूर केली आहे. यात १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ मध्ये ८० पैसे, २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ व २०२८-२९ मध्ये ९० पैसे तसेच २०२९-३० मध्ये १ रुपये प्रतियुनिट सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभघेण्यासाठी टीओडी मीटर घरगुती ग्राहकांकडे बसविणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT