

Rain casts shadow over Ganesh immersion in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवाच्या उत्साहात मराठवाड्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने २ ते ५ सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने गणेशाच्या आगमनापासून जोरदार पुनरागमन केले असून, संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक भागांत तुफान बॅटिंग सुरू आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले असून, पशुधन आणि काही ठिकाणी मनुष्यहानीही झाली आहे.
पुढील पाच दिवस पावसाचे धूमशाम कायम राहणार असल्याचा अंदाज एमजीएम वेधशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी व्यक केला आहे. या काळात ताशी ३० ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटास पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोते नकमान झाले आहे.