Kannad Husband Kills Wife Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | कन्नडमध्ये पतीकडून पत्नीचा झोपेतच खून; संशयित स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

गजानन कॉलनीतील घटना; ४२ वर्षीय रोहिणी कुंभकर्ण यांचा डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून खून

पुढारी वृत्तसेवा

Kannad Husband Kills Wife

कन्नड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात घरगुती वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील गजानन कॉलनी परिसरात रोहिणी मुकेश कुंभकर्ण (वय ४२) यांचा त्यांचे पती मुकेश कुंभकर्ण यांनी झोपेत असताना डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोहिणी कुंभकर्ण या झोपेत असताना मुकेश यांनी त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित मुकेश कुंभकर्ण हे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली .

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक स्वरूपात सांगितले जात असले, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी, हत्येमागील कारण आणि घटनेशी संबंधित इतर बाबींची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर घटनेचा सविस्तर तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT