Sambhajinagar illness paralyzes health system alert mode
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री तालुक्यातील खंमाटवस्ती पाथ्री येथे अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आ-लेली तीन बालके आढळल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे. तातडीच्या उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाने खंबाटवस्ती पाश्रीसह परिसरात सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत घरोघरी जाऊन आरोग्य पथकाने ४५० हून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली. यात कुणालाही अशी लक्षणे आढळून आली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
अचानक लुळेपणा व अशक्तपणा आलेल्या बालकांना तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात सर्वात लहान मुलगा अडीच वर्षांचा, दुसरा नऊ वर्षांचा तर तिसरा ११ वर्षांचा मुलगा आहे. तिघांपैकी ९ वर्षीय मुलाला १२ जुलै रोजी अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला.
१६ जुलै रोजी ११ वर्षीय मुलाला तर दुसऱ्याच दिवशी ३० महिन्यांच्या बालकाला हीच लक्षणे सुरू झाली. या तिघांनाही उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, एकाच गावातील तीन बालके अचानक अशक्तपणा आणि लुळेपणाची आढळल्याने हादरलेल्या आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण करत ४५० ते ५०० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोत बंद करून लोकांना शुद्ध व निर्जंतुक केलेले पाणी पुरवले जात आहे.
एएफपी (अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस) म्हणजे मुलांमध्ये स्नायूंच्या क्षीणतेसह अशक्तपणाची तीव्र सुरुवात होते. अशीच लक्षणे या तिन्ही बालकांमध्ये आढल्याने जिल्हा आरोग्य विभागाकडून एएफपी रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.
त्या तिन्ही बालकांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या दोन दिवसांत खंबाटवस्ती पाथ्रीसह परिसरात ४५० ते ५०० बालकांची तपासणी केली. यात कुणालाही अशी लक्षणे आढळली नसल्याने घाबरण्याचे कारण नाही.डॉ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य