Sambhajinagar has the highest number of students in the state for Navodaya exams
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात जवाहर नवोदय परीक्षेसाठी यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.
गतवर्षी या परीक्षेला जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थी बसले होते. यंदा ही संख्या १९ हजार ३११ इतकी झाली आहे. शनिवार, दि. १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर ही परिक्षा होणार आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय ही भारत सरकारची एक निवासी शाळा आहे. या शाळेत ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना मोफत, गुणवत्तापूर्ण निवासी शिक्षण दिले जाते. या ठिकाणी इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेश देण्यासाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेतली जाते.
यात मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यावर आधारित प्रश्न विचारले जातात. गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून या परीक्षेला १६ हजार विद्यार्थी बसले होते. यंदा ही संख्या विक्रमी स्वरुपात वाढली आहे. या वर्षी जिल्ह्यातील १९ हजार ३११ विद्यार्थ्यांनी परी-क्षेसाठी नोंदणी केली आहे. ही नोंदणी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जवाहर नवोदय परीक्षा दिश १३ डिसेंबर रोजी होणार आहे.
या परीक्षेच्या निमित्ताने शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी नुकताच पूर्वतयारी आढावा घेतला. लाठकर यांनी उपस्थित सर्व केंद्र संचालकांना परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सरोज, मार्गदर्शक अनिल पाटील, वानखेडे, गोंगे, उपशिक्षणाधिकारी सीताराम पवार, शिक्षण विस्तार अधिकारी जे. व्ही चौरे, दिलीप सिरसाट, सर्व गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, सचिन वाघ, सचिन शिंदे, मनोज चव्हाण, शिक्षण विभागातील संतोष डोईफोडे, धनाजी फड उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सर्व केंद्रसंचालक यांना परीक्षा केंद्रावर कोणती जबाबदारी पार पाडावी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. व्ही. चौरे यांनी केले.
नवोदय परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची स्पर्धा परी-क्षेची तयारी होते. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परी-क्षेसाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले. त्यामुळेच यंदा आपल्या जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी झाली आहे.अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी