Verul Leni School Bus Bike Collision Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Ellora Caves Accident | वेरूळ लेणीसमोर स्कूल बस - दुचाकीची धडक; एक गंभीर जखमी

वेरूळ येथील लेणी मोरीजवळील ब्रह्मकुमारीज वळणावर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Verul Leni School Bus Bike Collision

वेरूळ : वेरूळ येथील लेणी मोरीजवळील ब्रह्मकुमारीज वळणावर मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) स्कूल बस आणि मोटारसायकलची भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सह्याद्री विद्यामंदिर शाळेची बस (क्र. एमएच २८ बीबी ७६४२) वेरूळहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होती. याचवेळी समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच २० सीसी ६२९६) ब्रह्मकुमारीज वळणावर बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वाराला तातडीने मदत केली. रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने किंवा वाहनाच्या वेगामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT