Sambhajinagar News : संभाजीनगर-धाराशिव डीपीआरचे काम वेगात  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : संभाजीनगर-धाराशिव डीपीआरचे काम वेगात

पैठण - संभाजीनगर दुहेरीकरणासाठी प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar-Dharashiv DPR work at speed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नुकतेच छत्रपती संभाजीनगर पैठण गेवराई बीड-धाराशिव या रेल्वेमार्गाचा फायनल सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता या मार्गाच्या डीपीआरचे काम वेगात सुरू असून, छत्रपती संभाजीनगर ते पैठण या मार्गावर दुहेरीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खा. डॉ. भागवत कराड यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर ते धाराशिव हा २४० किलोमीटरचा रेल्वे मार्ग राहणार आहे. दरम्यान हा मार्ग एकेरी विद्युतीकृत राहणार आहे. हा मार्ग संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे मराठवाड्याचा मोठा भाग जोडला जाणार.

या मार्गामुळे उत्तर दक्षिण कनेक्टिव्हिटी, ऑरीक सिटीला जोडणी मिळणार आहे. येणाऱ्या दिवसांत छत्रपती संभाजीनगर आणि परिसरात मोठे प्रकल्प येऊ घातले आहेत. तसेच पैठण तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर येणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ५० किलोमीटरचा मार्ग दुहेरीकरणासहित मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामुळे औद्योगिक क्षेत्राला मोठे बळ मिळणार आहे व भविष्यात उपनगरीय वाहतूक सुरू करण्याचाही मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती कराड यांनी दिली.

रेल्वे मंत्र्यांशी चर्चा

नुकतीच कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी मराठवाड्यातील रेल्-वेच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. याची माहिती देण्यासाठी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वरील मागणीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. या बैठकीस रेल्वे अधिकाऱ्यांसह अनंत बोरकर, प्रल्हाद पारटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

वंदेभारतसाठी पिटलाईनची आडकाठी

छत्रपती संभाजीनगर येथून मुंबई मार्गावर नवीन वंदेभारत येत्या तीन महिन्यांत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यासाठी आवश्यक असलेल्या पिटलाईनचे काम अद्यापही रखडले असल्याने वंदेभारत एक्स्प्रेसला पिटलाईनची आडकाठी येणार आहे. आश्वासनांप्रमाणे ही गाडी मिळालीच तर पुन्हा ती जालना येथून सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT