कन्नड : १४ रोजी तालुक्यात वीज पडून भोकनगाव येथील एक तर बोलटेक येथील दोन असे एकूण तीन जण जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून वादळी वारा व विजेच्या कडकडाट सह भाग बदलत पाऊस हजेरी लावत असून तालुक्यातील भोकनगाव येथील नितीन भीमराव शिंदे (२३) हे शेतामध्ये मका लागवड करताना बाजूला विज पडून त्यांना धक्का बसला.
तसेच बोलटेक येथील दादारावं तुकाराम पवार (६०) चंद्रकला दादारावं पवार (५५) हे पती पत्नी शेतामध्ये झाडाजवळ उभे असताना विज पडून जखमी झाले. यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार चालू आहे. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली. तर शेतकऱ्यांनी वादळी वारा वीज पाऊस सुरु होण्या अगोदर सुरक्षित ठिकाणी जावे उघड्यावर किंवा झाडाखाली जुन्या भिंत लगत आसरा घेऊ नये असे आहवान केले.
तर तालुक्यातील गणेशपूर शिवरातील गट नं. ४३ मधील तातेराव भिमराव पवार यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडून बैल मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.