पाकिस्तानमधील उत्पादित वस्तूंची शहरात विक्री file photo
छत्रपती संभाजीनगर

पाकिस्तानमधील उत्पादित वस्तूंची शहरात विक्री

मनसेची पोलिसांकडे कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Sale of goods manufactured in Pakistan in the city

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

पाकिस्तानमध्ये उत्पादित वस्तूंची शहरातील बाजारपेठेत सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार मनसेने समोर आणला आहे. या वस्तूंच्या विक्रीमागे कोण आहे? त्यातून येणारा पैसा आतंकवादी संघटनांना पुरवला तर जात नाही ना? अशी शंका व्यक्त करत मनसेने सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच या वस्तू ताब्यात घेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही म्हटले आहे.

यासंदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन दिल्याचे मनसेचे उपशहर अध्यक्ष। अमित भांगे यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार शहरातील चेलीपुरा, शहागंज, सिटी चौक यासह काही भागांतील दुकानांमध्ये पाकिस्तानमध्ये उत्पादित वस्तूंची विक्री होत आहे.

यामध्ये साबण, क्रीम, टूथपेस्टसह कॉस्मेटिकच्या विविध वस्तूंचा समावेश असून, ज्यावर प्रॉडक्ट ऑफ पाकिस्तान असे लिहिले आहे. यापैकी काही वस्तू कार्यकर्त्यांमार्फत विकत मागवल्याचे अमित भांगे म्हणाले. पोलिस प्रशासनाला त्या पाकिस्तानच्या वस्तू दाखवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशा अनधिकृत असलेल्या वस्तू ताब्यात घेण्यात याव्यात. तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, निवेदनावर अमित भांगे यांच्यासह चंदू नवपुते, मोनु तुसे, किरण गवई, प्रसाद कर्जतकर यांची नावे आहेत.

या वस्तू आल्या कशा ?

शहरातील बाजारपेठेत थेट पाकिस्तानच्या वस्तू विक्री होत असल्याच्या धक्कादायक प्रकाराने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यात प्रामुख्याने म्हणजे या वस्तू शहरातील बाजारपेठेत आल्याच कशा ? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT