आरटीई प्रवेशाची निवड यादी जाहीर file photo
छत्रपती संभाजीनगर

आरटीई प्रवेशाची निवड यादी जाहीर

पहिल्या यादीत ४८६६ विद्यार्थ्यांची निवड; प्रवेश घेण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत

पुढारी वृत्तसेवा

RTE Admission Selection List Announced

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आरटीई अंतर्गत वादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात पहिल्या यादीत ४८६६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरटीई कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग घटकांतील मुलांना मोफत प्रवेश दिल्या जातो. त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून शाळांना अदा केले जाते. या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

जिल्ह्यातील ५४१ शाळांमधील ४९११ जागांसाठी १७ हजार १८७ अर्ज दाखल झाले होते. त्यातून शुक्रवारी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांची पहिली निवड यादी जाहीर करण्यात आली. यात ४८६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी

अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी/काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.

आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी. अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत.

त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची पावती पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील, असे शिक्षण विभागाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT