Madhubhai Kulkarni  Canva
छत्रपती संभाजीनगर

Madhubhai Kulkarni : संघ प्रचारक मधूभाई कुलकर्णी यांचं निधन; पंतप्रधान मोदींना राजकारणात आणण्यात होता मोठा वाटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुढारीने प्रसिध्द केलेल्या अन् सरसंघचालक देवरस यांनी दिला मोदींना राजकारणात जाण्याचा आदेश या बातमीत मधूभाईंचा उल्लेख करण्यात आला होता.

Anirudha Sankpal

RSS Pracharak Madhubhai Kulkarni :

छत्रपती संभाजीनगर :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जेष्ठ प्रचारक मधुभाई कुलकर्णी (88) यांचे वार्धक्यामुळे गुरुवारी दि. 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वा. निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय क्षेत्रात पाठवविण्यासाठी मधूभाईंनी मोलाची भूमिका बजावली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुढारीने प्रसिध्द केलेल्या अन् सरसंघचालक देवरस यांनी दिला मोदींना राजकारणात जाण्याचा आदेश या बातमीत मधूभाईंचा उल्लेख करण्यात आला होता. मोदी हे संघाचे विभाग प्रचारक आसतांना मधूभाई गुजरातचे प्रांत प्रचारक होते.

मधूभाई यांनी साठच्या दशकात संभाजीनगर येथे संघाचे प्रचारक म्हणून आपल्या प्रचारकी जिवनास प्रारंभ केला होता. त्यानंतर त्यांना गुजरातेत पाठविण्यात आले. तेथे संघाच्या उभारणीत मधूभाई सक्रिय राहिले. विभाग, प्रांत, क्षेत्रीय प्रचारक अशा जबाबदा-या त्यांनी संघात सांभाळल्या.

गेल्या काही वर्षापासून वृध्दापकाळामुळे त्यांचे वास्तव्य संभाजीनगरात होते. अलिकडे तबीयत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन आठवड्यापूर्वीच त्यांची प्रत्यक्ष भेट घेत प्रकृतीची चौकशी केली होती.

मधूभाईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी समर्पण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्यात आले आहे. त्यांनी देहदान केले आहे. त्यांचे पार्थिव रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आर के दमाणी मेडिकल कॉलेज येथे सायंकाळी नेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT