Vaijapur News : मोबाईल हॅक करून ३८ मिनिटांत ५.७९ लाख लंपास file photo
छत्रपती संभाजीनगर

Vaijapur News : मोबाईल हॅक करून ३८ मिनिटांत ५.७९ लाख लंपास

ई-चलन भरण्यासाठी केलेलं ऑनलाइन काम करणं वैजापूरच्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले.

पुढारी वृत्तसेवा

Rs 5.79 lakh siphoned off in 38 minutes after hacking a mobile phone

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : ई-चलन भरण्यासाठी केलेलं ऑनलाइन काम करणं वैजापूरच्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. एका अॅपच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला. अवघ्या ३८ मिनिटांत १५ आर्थिक व्यवहार करत तब्बल ५ लाख ७९ हजार ४१४ रुपये परस्पर वेगवेगळ्या खात्यांत वळते केले.

याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील फुलेवाडी रोड येथील गणेश श्रावण पवार यांना ग्राहकाच्या डीलरचे ई-चलन भरायचे होते. यासाठी त्यांनी गुगल क्रोम ब्राऊझरवर ई-चलनसंबंधित अॅपचा शोध घेतला. मात्र, अॅप सुरू होत नसल्याने त्यांनी उपलब्ध असलेल्या दुसऱ्या अॅपवर क्लिक केले.

हाच निर्णय त्यांच्या आर्थिक नुकसानीचे कारण ठरला. अॅप उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर २० ते २१ मिनिटांनी मोबाईलमध्ये अचानक अपडेट सुरू झाले. काही वेळातच मोबाईल रिसेट झाला. मोबाईल पुन्हा सुरू झाल्यानंतर पवार यांनी फोन पे व्यवहारांची हिस्ट्री तपासली. त्यावेळी त्यांच्या आयडीबीआय बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय अनेक व्यवहार झाल्याचे समोर आले.

अवघ्या ३८ मिनिटांच्या कालावधीत फोन-पे आणि यूपीआयच्या माध्यमातून १५ हून अधिक व्यवहार करण्यात आले. यातून ५ लाख ७९ हजार ४१४ रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते करण्यात आले. पवार यांनी तत्काळ सायबर हेल्पलाइन वर संपर्क साधून ऑनलाइन तक्रार नोंदवली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT