

Drop in the city's minimum temperature
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात हिमवृष्टी सुरू झाल्याने शहराच्या किमान तापमानात घट झाली आहे. पारा १२.४ अंशावर आला आहे. परतु, अल निनोच्या प्रभाव अजूनही कायम असल्याने गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारच्या (दि. २०) कमाल तापमान १.१ अंशाने वाढून ३१.३ अंश सेल्सिअसवर पोचहले आहे.
शहराच्या किमान तापमानात मागील आठवडाभरापासून हळूहळू घट होतांना दिसत आहे. उत्तरेकडे हिमवृष्टीला सुरूवात झाली आहे. त्याचा परिणाम शहराच्या तापमानावर जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. ते म्हणाले, यंदा वेळेत हिमवृष्टी सुरु झाली आहे. त्याचाच हा परिणाम आहे.
गेल्या आठवड्यात किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहिले. सतत तापमान कमी अधिक होत राहिले. परंतु, या हिमवृष्टीमुळे शुक्रवारी अचानक तापमानात ३.२ अंशाची घट होऊन पारा १२.४ अंशांवर पोहचल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शहरात पहाटे आणि सायंकाळी ७ वाजेनंतर गारठा अधिक प्रमाणात होता. शहरात सर्वत्र हुडहूडी पसरली होती. दरम्यान, पहाटे आणि रात्री गारठा असला तरी दिवसभर अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता अधिक होती.