Right direction for society through Harinam Week: Mahant Ramgiri Maharaj
गंगापूर : गंगागिरी महाराज यांनी २०० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात तरुणांना सप्ताहाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवाहात आणले. मुघल शासन असतानाही परंपरा बंद पडू दिली नाही. मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्याच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे, मनोवृत्ती बदल झाला तरच खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आहे, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्रीक्षेत्र गोदाघाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला कीर्तनातून त्यांनी मार्गदर्शन केले. महाराज म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची गरज आहे. गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातून अनेकांचे व्यसन नष्ट झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातही महाराजांनी अनेक अडचणींना सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.
अध्यात्मात आल्यास भजन कीर्तन नाही आले तरी चालेल, परंतु वाईट मार्गान तरी तरुण जाणार नाही. शास्त्र हे नित्य नवीन असून, अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातल्यास मानवी आरोग्यासाठी फार मोठी देणगी आहे. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो, दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात.
मनाची वृत्ती बदलण्याची ताकत फक्त हरिनाम सप्ताह आतच असल्याचे महाराज म्हणाले. महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, नामदार राधाकृष्णन विखे पाटील, सुरेश चव्हाणके, आमदार रमेश बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दिनेश परदेशी, अविनाश गंलाडे, डॉ प्रकाश शेळके, सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंद महाराज विक्रम महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज उपस्थित होते. महाप्रसादाचा लाभ लाखो भाविकांनी घेतला.