Rickshaw driver kidnapped; ₹15,000 ransom demanded via call to wife
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा ऑटो रिक्षाचालकाचे अपहरण करून त्याच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर त्याच्या पत्नीला फोन करून १५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावर न थांबता आरोपींनी रिक्षाचालकाकडे तब्बल १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर आरोर्पीनी त्याला रिक्षासह कायगाव टोका परिसरातील पेट्रोलपंपावर नेले. तेथे तलवार दाखवून पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न सुरू असतानाच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
गंगापूर पोलिसांनी तातडीने धाव घेत तिघांसह एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. या कारवाईत तलवार, चाकू आणि १२ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर करण्यात आली.
या प्रकरणात नितीन मच्छिंद्र जाधव, सौरभ विजय आव्हाड आणि एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. गणेश सदाशिव कदम (३८) हे (एमएच-२०-ईके-५६४५) रिक्षा चालवतात. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचवटी येथून रांजणगावकडे जात असताना नगर नाका येथे दोन प्रवासी रिक्षात बसले. त्यांनी जोगेश्वरी येथे जाण्याचे सांगितले. रांजणगाव येथे आधीचे प्रवासी उतरले. त्यानंतर नगर नाका येथून बसलेल्या दोघांनी अन्य तिघांना फोन करून फोस्टर कंपनीच्या मागील बाजूस बोलावून घेतले.
पाचही जण एकत्र आल्यानंतर त्यांनी तलवार व चाकूचा धाक दाखवत कदम यांना मारहाण केली आणि रिक्षा ताब्यात घेतली. त्यांना जोगेश्वरी येथील दत्त मंदिर परिसरात नेण्यात आले. तेथे कदम यांच्याकडील २ हजार ८०० रुपये व मोबाईल हिसकावून घेण्यात आला.
यानंतर एका आरोपीने कदम यांच्या पत्नीला फोन केला. पतीला जिवंत पाहायचे असेल तर १५ हजार रुपये पाठवा,' अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या पत्नीने फोन-पेच्या माध्यमातून पाच-पाच हजार रुपयांचे तीन व्यवहार करून १५ हजार रुपये पाठवले-