ग्रामपंचायतींची प्रभाग आरक्षण सोडत 12 जून रोजी pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Gram Panchayat reservation draw : ग्रामपंचायतींची प्रभाग आरक्षण सोडत 12 जून रोजी

सोडत कार्यक्रम जाहीर, कन्नड आणि गंगापूरमधील पूर्वीच्या अधिसूचना रद्द

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग््राामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 638 ग््राामपंचायतींची प्रभाग आरक्षण सोडत 12 जून रोजी काढण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या विविध याचिकांवरील निर्णय आणि बांठिया आयोगाच्या शिफारशी लक्षात घेऊन नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवली जाणार आहे. सन 2024 मध्ये मुदत संपलेल्या कन्नड तालुक्यातील 3 ग््राामपंचायती (रामनगर, विटा व पळसखेडा-खापरखेडा) आणि सन 2025 मध्ये मुदत संपलेल्या गंगापूर तालुक्यातील 2 ग््राामपंचायती (ईटावा व घाणेगांव) यांच्या प्रभाग आरक्षणाची पूर्वी प्रसिद्ध केलेली अंतिम अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे या सर्व 5 ग््राामपंचायतींसाठी आता सन 2026 च्या नवीन नियमांनुसार पुनश्च आरक्षण सोडत काढली जाईल.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) राखून ठेवावयाच्या जागा एकूण जागांच्या 27 टक्क्यांपर्यंत असतील. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) यांचे एकत्रित एकूण आरक्षण ग््राामपंचायतीमधील एकूण जागांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही. एकूण जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील आणि त्याची सोडत चक्रानुक्रमे फिरवली जाईल. जिल्हाधिकारी जी. सी. गौडा यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

निर्भय, मुक्त वातावरणात पार पडणार निवडणूक

ग््राामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया संपूर्णपणे निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच यामध्येही सर्व काळजी व दक्षता घ्यावी. सर्व तहसीलदारांनी आरक्षण सोडतीचा अहवाल व प्रस्ताव 15 जून 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात दोन प्रतीत न चुकता सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकार्‌‍यांना दिले आहेत.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

  • आरक्षणाची सोडत काढण्यासाठी विशेष ग््राामसभेची सूचना देणे - सोमवार, दि. 08 जून 2026

  • प्राधिकृत अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग््राामसभा बोलवून आरक्षण सोडत काढणे - शुक्रवार, दि. 12 जून 2026

  • प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचेला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता देणे - बुधवार, दि. 17 जून 2026

  • प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे - शुक्रवार, दि. 19 जून 2026

  • नागरिकांना आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी - 19 जून 2026 ते 25 जून 2026

  • उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन अभिप्राय देणे - शुक्रवार, दि. 03 जुलै 2026

  • जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्रायानुसार अंतिम अधिसूचनेस मान्यता देणे - बुधवार, दि. 08 जुलै 2026

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT