Renukadevi-Sharad Cooperative Factory crushes 1.5 lakh tonnes of sugarcane
पैठण, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विहामांडवा परिसरातील चौंढाळा येथील रेणुकादेवी-शरद सहकारी साखर कारखान्याने यंदा विक्रमी ऊस गाळपाकडे ऊसउत्पादक सभासद, कामगार यांच्या सहकायनि घोडदौड सुरू असून, या हंगामाच्या दोन महिन्यांत कारखान्याने तब्बल १ लाख ५१ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती चेअरमन दत्तात्रय रेवडकर यांनी दिली.
तालुक्यातील विहामांडवा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद अवस्थेत असलेला. चौढाळा येथील रेणुकादेवी - शरद कारखाना खासदार संदीपान भुमरे यांनी सुरू करून या परिसरातील शेतकरी, ऊसउत्पादक सभासद यांना मोठा दिलासा देऊन या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला.
या कामगार व सभासद संचालक मंडळाच्या सहकायनि प्रत्येक हंगामात ऊस गाळप उद्दिष्ट वाढून यंदाच्या हंगाम दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी ऊस गाळपला सुरुवात करण्यात आली. दि.६ फेब्रुवारीपर्यंत या कारखान्यांतर्गत २ लाख ५१ हजार मॅट्रिक टन ऊस गाळप करून १ लाख ३६ हजार साखरेची पोती उत्पादित केली आहेत.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात येऊन भविष्यात शेतकरी, सभासदांसाठी कारखान्याच्या परिसरात अनेक योजना राबविण्याचे नियोजन संचालक सुरू केले. यंदाच्या हंगामात कारखान्याचे चेअरमन आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे बावडकर, शुगर मिलची चेअरमन दत्तात्रय लक्ष्य ठेवले आहे.
कारखान्याचा गाळप यशस्वी करण्यासाठी कार्यकारी संचालक नामदेव रेवडकर, दासू रेवडकर, जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील, रमेश झिरपे, सचिन आसवे, सोमनाथ मुळे, श्रीमंत टेकाळे, महेश ढालपे, राजेंद्र चौधरी, दिनकर औताडे, अशोक शेटे व संचालक, सभासद कामगार परिश्रम घेत आहेत.