Sambhajinagar News : डीपीसी निधी कपातीच्या संकटातून जि. प.ला दिलासा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : डीपीसी निधी कपातीच्या संकटातून जि. प.ला दिलासा

सिमेंट रस्त्यांचे ५० ते ६० कोटी मात्र अन्यत्र वळवावे लागणार

पुढारी वृत्तसेवा

Relief for Zilla Parishad from the crisis of DPC fund cuts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या २१५ कोटी रुपयांच्या निधीत ३० टक्के कपात होण्याची शक्यता होती. मात्र, सुधारित शासन निर्णयात निधी कपातीचे निर्देश नसल्याने जिल्हा परिषदेला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मंजूर नियोजनानुसार २१५ कोटींचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सिमेंट रस्त्यांसाठी नियोजित ५० ते ६० कोटी रुपयांच्या निधीचे अन्य विकासकामांसाठी पुनर्नियोजन करावे लागणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी दिली.

डीपीसीच्या निधी नियोजनासंदर्भात बुधवारी (दि. २५) जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात बैठक झाली. अध्यक्ष गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला सभापती सचिन गरड, अनिता मोठे, मीनाक्षी पवार, बालाजी सोनटक्के, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांसह खातेप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. सुधारित शासन निर्णयानुसार जनसुविधा, नागरी सुविधा तसेच ३०५४ आणि ५०५४ या लेखाशीर्षांअंतर्गत प्रस्तावित सिमेंट रस्त्यांची कामे रद्द करण्याबाबत चर्चा झाली.

या कामांसाठीची तरतूद ग्रामपंचायत कार्यालये, ग्रामसचिवालयांच्या इमारती, स्मशानभूमी, रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी वळविण्यात येणार आहे. यातून सुमारे ५० ते ६० कोटींच्या निधीचे पुनर्नियोजन होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT