Kapus Kisan app : कापूस विक्रीसाठी 'कापूस किसान' ॲपवर नोंदणी आवश्यक file photo
छत्रपती संभाजीनगर

Kapus Kisan app : कापूस विक्रीसाठी 'कापूस किसान' ॲपवर नोंदणी आवश्यक

बाजार समितीकडून नोंदणी कक्ष सुरू, ई-पीक पाहणीत कापसाचा पेरा बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

Registration on the 'Kapus Kisan' app is mandatory for selling cotton

मंठा, पुढारी वृत्तसेवा : कापूस हंगाम २०२६-२७ मध्ये भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय) मार्फत किमान आधारभूत किंमत (एमएपी) अंतर्गत ८ हजार ६६७ रूपये प्रति क्विंटल दराने शासकीय कापूस खरेदीसाठी यंदा 'कापूस किसान' मोबाईल अॅपवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अॅपवर नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर घेतला जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांना ई पीक पाहणीत कापसाचा पेरा असणे बंधनकारक आहे.

मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी नसल्याने त्यांना हमीभावापासून वंचित राहावे लागले आणि कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागला. यंदा हीच चूक होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी.

यासाठी मंठा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे मोफत नोंदणी करून दिली जात आहे. नोंदणीचा कालावधी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ सीसीआयच्या सूचनेनुसार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतच अॅपवर संग्रहित फोटो नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर खरेदीची तारीख, केंद्राचे ठिकाण आणि पेमेंटची माहिती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री करणे सोयीचे होणार आहे.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

ऑनलाइन कापूस पेरा असलेली सातबारा, प्रत, आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व अडचण आल्यास मंठा बाजार समिती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंठा तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तत्काळ नोंदणी करून शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा करून घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव रमेश बोराडे यांनी केले आहे.

अॅपवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ सीसीआयच्या सूचनेनुसार तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीतच अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर खरेदीची तारीख, केंद्राचे ठिकाण आणि पेमेंटची माहिती थेट शेतकऱ्याच्या मोबाईलवर मिळणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT