रेडीरेकनरचे दर स्थिर; नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार दिलासा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

रेडीरेकनरचे दर स्थिर; नवीन घर घेणाऱ्या ग्राहकांना मिळणार दिलासा

शासनाने यात कोणतीही वाढ न करता गतवर्षीचेच दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे शहरात घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ready Reckoner Rates Remain Stable; Relief for Homebuyers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन आर्थिक वर्षात म्हणजे १ एप्रिलपासून स्थावर मालमत्तांच्या बाजारमूल्यात (रेडीरेकनर) वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शासनाने यात कोणतीही वाढ न करता गतवर्षीचेच दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे शहरात घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी ३१ मार्च रोजी पुढील आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. त्यानुसार यंदाही नोंदणी व मुद्रांक विभागाने रेडीरेकनर दरात ५ ते ८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता, परंतु शासनाने हा प्रस्ताव अमान्य करत जुनेच दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. रेडीरेकनगरच्या दरात नवीन वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. गतवर्षी रेडीरेकनरच्या दरात मनपा हद्दीत सरासरी ३.५३ टक्के तर ग्रामीण भागासह प्रभाव क्षेत्रात सरासरी तीन टक्के वाढ करण्यात आली होती.

२०२०, २०२१ मध्ये कोरोनामुळे दरवाढ झाली नव्हती. तसेच २०२३ सालीही जुनेच दर कायम ठेवले होते. २०२४-२५ साली लोकसभा-विधानसभा निवडणुकीमुळे जुनेच दर ठेवले होते. त्यानंतर गतवर्षी या दरांमध्ये वाढ करण्यात आली. आता २०२६-२७ साली आधीचेच दर कायम ठेवले आहेत.

जिल्ह्यात खरेदी विक्रीचे दिवसभरात ४०५ व्यवहार

रजिस्ट्री कार्यालयांमध्ये शेवटच्या दिवशी गर्दी, ६७ लाखांचा मिळाला महसूल छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात मालमत्ता खरेदी-विक्रीचे नियोजित व्यवहार पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील १३ कार्यालयांमध्ये तब्बल ४०५ दस्त नोंदणी झाली. विभागाला सुमारे ६७ लाखांचा महसूल मिळाला आहे.

शनिवारी, रविवारी सार्वजनिक सुट्या आल्या होत्या. तर मंगळवारी महावीर जयंतीची सुटी होती, परंतु शासनाने या सर्व सुट्या रद्द करून कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे नागरिकांनीही आपले नियोजित व्यवहार या तीन दिवसांमध्ये पूर्ण करून घेतले. ३१ मार्च रोजी ४०५ दस्तांची नोंदणी होऊन ६७ लाखांचा महसूल प्राप्त झाला. सर्वाधिक ९६ दस्त दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ५ मध्ये नोंदविले. तर फुलंब्री येथील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमाक ४ येथे केवळ १ दस्ताची नोंदणी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT