एसआयआरमध्ये वगळलेल्या ६ लाख मतदारांची पुन्हा पडताळणी file photo
छत्रपती संभाजीनगर

SIR : एसआयआरमध्ये वगळलेल्या ६ लाख मतदारांची पुन्हा पडताळणी

मृत, स्थलांतरित, दुबार, अनुपस्थितांचा समावेश; सोमवारपासून प्रपत्र वितरण

पुढारी वृत्तसेवा

Re-verification of 6 lakh voters excluded from the SIR

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा भारत निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळून नवी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

आता या वगळलेल्या मतदारांची पुनर्पडताळणीचा निर्णय आयोगाने घेतला असून यात जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ८ हजार ४०० मतदारांचा समावेश आहे. यासंदर्भात राज्याचे अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी प्रशांत नावगे यांनी आदेश जारी केले असून त्यानुसार जिल्ह्यात सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

एसआयआर प्रक्रियेत बीएलओंनी अनेकांची नावे वगळल्याचा आरोप अनेकांनी केले आहेत. तसेच या वगळलेल्या नावांची आकडेवारीवरुन आंदोलनेही सुरू आहेत. काहींनी तर जिवंत असलेल्यांना बीएलओंनी मृत दाखवून यादीतून वगळल्याचा आरोपही केला आहे. मात्र, यात बहुतांश मतदार बीएलओंना दिलेल्या पत्त्यांवरच अढळूनच आले नाहीत, अन् त्यांचीच नावे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकले नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

परंतु, या मतदारांची आता पुन्हा नव्याने पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वगळलेल्यांना नव्याने संधी मिळणार आहे. त्यासाठी पुनर्पडताळणी कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, आयोगाकडून बुधवारी आदेश जारी केल्याने आता गणना प्रपत्र तयार करून ते बीएलओंकडे देण्यासाठी किमान दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सोमवारपासून प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

पडताळणीचे वेळापत्रक

गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रपत्रांचे वितरण आणि संकलन होईल. त्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत प्राप्त प्रपत्रे निकाली काढण्यात येणार आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २२ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

३२६४ बीएलओ

येत्या सोमवारपासून ३२६४ बीएलओ यांना गणना प्रपत्र वितरित केले जातील. त्यानंतर हे सर्व बीएलओ वगळलेल्यांचा दिलेल्या पत्त्यावर शोध घेऊन त्यांना प्रपत्रांचे वितरण करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT