Re-survey the Dharashiv-Chhatrapati Sambhajinagar road and start work immediately.
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : रेल्वेच्या धाराशिव-बीड छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित मार्गाचे पुन्हा सर्व्हेक्षण करून काम तत्काळ सुरु करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश - राजेनिंबाळकर यांनी केला आहे. मध्य रेल्वे विभागाची विभागीय समितीची बैठक सोमवारी (दि. २३) पुणे येथे पार पडली. बैठकीत धाराशिव लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या अनेक प्रश्नासंदर्भात खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. रेल्वे प्रवाश्यांना येणाऱ्या अनेक - अडचणी सोडवण्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.
यावेळी रेल्वेचे जनरल मॅनेजर धरम वीर मीना, खा. डॉ. सुप्रिया सुळे, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. अमोल - कोल्हे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. निलेश लंके, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. भाऊसाहेब वाघचौरे, - खा. विशाल पाटील उपस्थित होते.
-धाराशिव, बार्शी, लातूर व मराठवाडा परिसरातील रेल्वे विकास संदर्भात महत्त्वाच्या मागण्या अमृत भारत योजना अंतर्गत रेल्वे स्थानकांचा समावेश व विकास बार्शी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश करून स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात यावा. धाराशिव रेल्-वेस्थानकावर सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा कमी असल्याच्या तक्रारी असून, कामांची गुणवत्ता राखण्यासाठी महाप्रबंधक, अधिकारी व ठेकेदार कंपनी यांच्यासह संयुक्त पाहणी दौरा आयोजित करावा. नवीन रेल्वेमार्ग व दुहेरीकरणासाठी मागण्या धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गासाठी निधी मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे व काम त्वरित सुरू व्हावे. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गाचे काम २०२७अखेर पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात यावी.
लातूर रोड कुर्दुवाडी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वे बोडनि घेतलेला निर्णय स्पष्ट करण्यात यावा. नांदेड लातूर रोड नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीस गती देण्यात यावी. पंढरपूर कुईवाडी परांडा भूम वाशी बीड जालना शेगाव या महत्त्वाच्या मार्गाच्या निर्मितीस मान्यता देण्यात यावी. स्थानक आणि थांबे संदर्भातील मागण्या वडगाव (ता. धाराशिव) गावाच्या सरहद्दीत नवीन स्थानकाची मागणी नागरीकांनी केली असून, भविष्यातील एम.आय.डी.सी मुळे ते महत्त्वाचे ठरणार आहे, आदी मागण्या त्यांनी केल्या.
धाराशिव स्थानकावर कोच इंडिकेटर, ए.टी.एम., लॉकर सुविधा, स्वतंत्र महिला प्रतीक्षा-लय, आणि दोन बुकींग क्लार्कची नियुक्ती करण्यात यावी. धाराशिव स्थानकाजवळ माल उतरण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म व गुड्स शेड बांधण्यात यावे. आरपीएफ कर्मचारी संख्येत वाढ करून स्थानकाच्या सुरक्षेचा दर्जा सुधारावा, शहरात स्वतंत्र रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालय सुरू करावे व कर्मचारी संख्या वाढवावी.