उबाठाचे रशीद मामू खान विजयी, प्रवेश दिल्याने ठाकरे सेनेवर झाली होती टीका File Photo
छत्रपती संभाजीनगर

उबाठाचे रशीद मामू खान विजयी, प्रवेश दिल्याने ठाकरे सेनेवर झाली होती टीका

प्रभाग ४ मधून रशीद मामू यांच्यासह गणेश लोखंडे असे एकाच प्रभागातून उबाठाचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Rashid Mamu Khan of the Uddhav Thackeray faction emerged victorious; the Thackeray Sena had faced criticism for giving him a ticket

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

उबाठाने काँग्रेसचे माजी महापौर रशिद खान मामू यांना प्रवेश दिल्यानंतर राज्यभरात टीकेची झोड उठावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरचे नाव बदलण्यासाठीच मामूंना प्रवेश दिल्याचेही आरोप मंत्री नितेश राणे यांनी केले होते. परंतु, प्रभाग ४ मधून रशिद मामू यांच्यासह गणेश लोखंडे असे एकाच प्रभागातून उबाठाचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.

महापालिकेच्या निवडणूकीसाठी उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच काँग्रेसचे माजी महापौर रशिद मामू खान यांनी उबाठामध्ये प्रवेश केला होता. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला होता. त्यावरुन भाजपने राज्यभरात ठाकरेंवर टीकेची झोड उठवली होती.

सोशल मीडियावरही त्यावरून ट्रोल करण्यात आले होते. परंतु, मनपा निवडणुकीत ठाकरे सेनेचे रशिद मामू खान यांना मतदारांनी कौल देत विजयी केले. मामू आणि त्यांच्यासोबत प्रभाग ४ मधून लोखंडे हे देखील विजयी झाले आहेत. या विजयानंतर उद्धव ठाकरे गटात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT