Sambhajinagar News : वेतन थकल्याने रांजणगाव ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे आंदोलन file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वेतन थकल्याने रांजणगाव ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रशासकाअभावी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Ranjangaon Gram Panchayat Employees Protest Over Unpaid Salaries

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : प्रशासकाअभावी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे. थकीत वेतन मिळावे यासाठी शुक्रवारी (दि.२२) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.

रांजणगाव ग्रामपंचायतीमध्ये एकूण ५९ कर्मचारी काम करत असून प्रशासकांअभावी या कर्मचाऱ्यांचे गत चार महिन्यांपासून वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. थकीत वेतन अदा करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी बेमुदत संपाचा इशारा दिला होता.

यावरून आज शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी गणेश धनवई, दत्तू हिवाळे, बाबुराव हिवाळे, माजी उपसरपंच भीमराव कीर्तिकर यांनी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी धनवई यांनी

थकीत वेतनासाठी कामबंद आंदोलन करताना ग्रा. पं. कर्मचारी. ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकाची नियुक्ती होताच थकीत वेतनापैकी दोन महिन्याचे वेतन देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच कर्मचाऱ्यांना किराणा दुकानातून उधारीवर सामान भरून देऊ अशी हमी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेतले. किशोर काळवणे, गणेश गायके, सिद्धेश्वर मुळे, गीता वाघ, बाळू कुऱ्हाडे, नवनाथ शिंदे, अरुण घुसाळे आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा या आंदोलनात सहभाग होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT