Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा पुन्हा हाहाकार File Photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा पुन्हा हाहाकार, संभाजीनगरातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही ढगफुटी

अनेक गार्वाचा संपर्क तुटला. शेती पाण्यात गेल्याने पुन्हा हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

पुढारी वृत्तसेवा

Rains wreak havoc again in Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडधात रविवारीही पावसाने पुन्हा एकदा कहर केला. बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावात ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक गावामध्ये पूर आला. पुराच्या पाण्यात अनेक जण अडकले. अनेक गार्वाचा संपर्क तुटला. शेती पाण्यात गेल्याने पुन्हा हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पावसाने दोन नागरिकांसह अनेक जनावरांचा बळी घेतला. विभागातील आणखी ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मागील आठ दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बेंटिंग सुरू आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची नोंदही होत आहे. यातच रविवारी (दि.१४) दिवसभरात सरासरी १७.५ मिमी पावसाची नोंद मराठवाड्यात झाली. यात सर्वाधिक ३७.१ मिमी बीड जिल्ह्यात, या पाठोपाठ २८.२ मिमी धाराशिव, परभणीत २४.८, तर लातुरात २४.४ मिमी पाऊस बरसला आहे. विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने चांगली हजेरी दिली आहे. यात विभातील ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. ही मंडळे बीड, लातूर, धाराशिव, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील आहेत. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचेही मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचे घुमशान सुरू असताना छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात मात्र किरकोळ वृष्टी झाली आहे. संभाजीनगरमध्ये ५.५, तर जालना जिल्ह्यात अवघे २.८ मिमी पाऊस कोसळला आहे.

कुठे किती अतिवृष्टी

रविवारी बीड जिल्ह्यातील सर्वाधिक १५ मंडळांसह लातुरातील ४, धाराशिवमधील ७, परभणीतील ४ आणि हिंगोलीतील २ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

नुकसानीचा आकडा पंधरा लाख हेक्टरवर

मराठवाड्यात यंदा सातत्याने मुसळधार पाऊस होतो आहे. त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या पावसाळ्यातील शेती पिकांच्या नुकसानीचा आकडा आता पंधरा लाख हेक्टरवर पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ६ लाख ५४ हजार हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ लातूर जिल्ह्यात २ लाख ७४ हजार हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ७३ हजार हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टर, परभणी जिल्ह्यात १ लाख ५१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

संभाजीनगरातील सिल्लोड, सोया तालुक्यातही ढगफुटी

जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव तालुक्यांत सोमवारी पहाटे (दि.१५) अतिवृष्टी झाली. पैठण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे दीड फूट उघडण्यात आले आहे. तर तालुक्यातील पंथेवाडी येथे दोन मेंढपाळांची ५४ जनावरे ओढ्याला आलेल्या पूरात बाहुन गेली. तर कन्नड शहरासह परिरात संततधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळात ढगफुटीसहश पाऊस झाला.

घाटनांद्रासह परिसरातील घारला, चारणेर, पेंडगाव, चारणेरवाडी, आमठाणा, केळगाव, धावडा, धारला आदी गावांसह आमताणा मंडळांमध्ये सोमवारी पहाटे चीन ते सहा वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. सिल्लोड शहरासह पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेला खेळणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. सोमवारी पहाटे आमठाणा परिसराव ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने चारणेर पेंडगाव प्रकल्पही ओव्हरफ्लो झाला. आतापर्यंत तालुक्यातील निल्लोड, केळगाव, खेळणा व चारणेर पेंडगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

अनेक जनांवरे वाहून गेली

पैठण तालुक्यातील रहाटगाव येथील दोन मेंढपाळ पंथेवाडी परिसरात मागील काही दिवसांपासून राहत होते. पंथेवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने जवळच्या ओढ्याला पूर आला. यात दोन मेंढपाळांची १४ मेंड्या, २८ कोकरे, ९ लळ्या, एक बैल, दोन गोन्डे वाहून गेले.

सोयगाव तालुका

तालुक्यात बनोटीसह परिसरात सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गफुटीसदृश जवळपास एक ते दीड तास पाऊस झाला, मनुबाई, हिवरा, पळाशी नद्यांना मोठा पूर आला, नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे परिसरात वाहतूक विस्कळीत झाली, मालेगावब, सोयगाव, चाळीसगावकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

नदीकाठच्या गावांत पाणी शिरले

देऊळगाव बाजार, आमठाणा, चारणेर, पिंपळगाव घाट, जांभई, विरगाव, पंडगाव आदी नदीकाठच्या गावांत पाणी शिरले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. देऊळगाव बाजार येथील नदीकाठच्या दुकानात अडकल्याने नागरिकांना जीव वाचवण्यासाठी छतावर टात्र काढावी लागली. सोमवारी महसूल विभागाच्या मदत पथकाने राबवलेल्या मोहिमेत त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

कुंडलिका प्रकल्पाचे पाच दरवाजे प्रत्येकी १ मीटरने उघडण्यात आले असून, नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. कापूस, सोयाबीन, फळबागा पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT