औरंगपुऱ्यात तनवाणीच्या जुगार अड्यावर पुन्हा छापा File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gambling Den : औरंगपुऱ्यात तनवाणीच्या जुगार अड्यावर पुन्हा छापा

पाच महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई; महिलेसह १४ जुगारी ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Raid again on Tanwani's gambling den in Aurangpur

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदाराच्या भावाच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी पाचच महिन्यांत दुसऱ्यांदा छापा मारून मालकासह १४ जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई औरंगपुरा येथील दादा डोसा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर करण्यात आली. पोलिसांनी रोख रकमेसह एकूण १ लाख ६४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका महिलेसह १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमंडी परिसरातील विष्णू लेखराज तणवाणी यांच्या मालकीच्या दादा डोसा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये बेकायदेशीर जुगार बिनबोभाटपणे सुरू होता. विशेष म्हणजे जुलै महिन्यातच या ठिकाणी गुन्हे शाखेने छापा मारून तनवाणीसह २३ जुगारींना पकडले होते.

त्यानंतरही पुन्हा याच ठिकाणी विष्णू तनवाणीने पुन्हा जुगार अड्डा सुरू केल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपायुक्त पंकज आतुलकर व सहाय्यक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी चौक पोलिसांनी पथकासह या ठिकाणी शनिवारी (दि.२०) रात्री सव्वाआठच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी जुगार चालक विष्णू लेखराज तणवाणी (६२) यांच्यासह सुनीता दाभाडे, डिगंबर वालडे, संजय भैरव, शेख नदीम, महेश जैन, किशोर शेजवळ, सुरेश जाधव, विष्णू गायकवाड, सुरज जावळे, राजू जैस्वाल, गौतम गवई, अनिल वाहुळ, नवीन बंगारकर यांना ताब्यात घेतले. जुगाराचे साहित्य, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल आणि ५७ हजार ५१० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ६४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई सिटी चौक ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, श्रीनिवास रोयलावार, उपनिरीक्षक संजय राठोड, सहाय्यक फौजदार मुनीर पठाण, हवालदार इरफान खान, घोडके, टेकले, त्रिभुवन, पंडित, वाहुळ आणि जारवाल व पाटील यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT