Shravan : खुलताबादेत पहिल्या श्रावण शनिवारी दर्शनासाठी दिवसभर रांगा file photo
छत्रपती संभाजीनगर

Shravan : खुलताबादेत पहिल्या श्रावण शनिवारी दर्शनासाठी दिवसभर रांगा

लाखो भाविकांनी घेतले भद्रा मारुतीचे मनोभावे दर्शन, शहरातील प्रमुख मार्गावर वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

Queues for darshan throughout the day at Khultabad on the first Saturday of Shravan

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिरात पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच शनिवारी भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला. रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली होती. पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या.

'जय बजरंगबली', 'श्रीराम'च्या जयघोषाने अवधी खुलताबाद नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली. श्रावण महिन्यातील शनिवार हा श्री भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक खासगी वाहने, बस तसेच पायी खुलताबादेत दाखल झाले.

सकाळपासूनच शहरात येणारे प्रमुख मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. पुरुष-महिलांसाठी स्वतंत्र रांगा होत्या. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. विशेष दर्शन पासची सुविधा बंद असल्याने तातडीने दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा काहीसा हिरमोड झाला.

पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. लांबच लांब रांगांमध्ये भाविक संयमाने उभे राहून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेत होते. भाविकांची वाढती संख्या आणि वाहनांची प्रचंड वर्दळ यामुळे खुलताबाद शहरातील तसेच मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले होते.

सोयी-सुविधांकडे लक्ष

संस्थानचे अध्यक्ष मिठठू बारगळ आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने त्यांच्या सोयी-सुविधांची विशेष काळजी घेतली जात आहे. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी मंदिर परिसर, दर्शन रांगा तसेच शहरातील प्रमुख मार्गावर तैनात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT