Mangalsutra snatched : पेढा देऊन वृद्धेचा विश्वास संपादन; चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र लुटले

या प्रकरणी कृष्णा जाधव यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
Sambhajinagar Crime
Mangalsutra snatched : पेढा देऊन वृद्धेचा विश्वास संपादन; चाकूचा धाक दाखवत मंगळसूत्र लुटलेFile Photo
Published on
Updated on

Mangalsutra snatched at knifepoint

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून तिला दुचाकीवर बसवले. त्यानंतर म्हाडा कॉलनीजवळील खदानी परिसरात नेऊन चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १५) सका-ळी घडली.

Sambhajinagar Crime
Crime News : तिरंगा रॅलीच्या गर्दीत भरधाव ट्रॅक्टर; हटकल्याने भाजप नगरसेवकाच्या अंगावर घातले वाहन

लक्ष्मीबाई दामोदर जाधव या सकाळी सुमारे १० वाजता गणपती मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. या वेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना पेढा दिला. त्यानंतर "रमेश काकांची तब्येत बिघडली आहे, मला बाळूने पाठवले आहे," असे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना दुचाकीवर बसवून घेतले.

संशयिताने त्यांना म्हाडा कॉलनी परिसरातील खदानीजवळ नेले. तेथे दमदाटी व शिवीगाळ करून, चाकूचा धाक दाखवत "दागिने न दिल्यास जीवे मारीन," अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र काढून घेतले.

Sambhajinagar Crime
Gangapur News : पाण्यात वीजप्रवाह; दोन सख्ख्या भावांचा बळी

दरम्यान, काही नागरिक त्या परिसराची जात असताना त्यांच्या हा संशयास्पद प्रकार लक्षात आला. नागरिक येत असल्याचे दिसताच संशयिताने दुचाकीवरून तेथून पळ काढला आणि वृद्ध महिलेला घटनास्थळीच सोडून दिले. काही वेळाने लक्ष्मीबाई यांचा नातू कृष्णा रमेश जाधव त्याच रस्त्याने जात असताना त्याला आजी तेथे दिसली.

"आजी, तुम्ही येथे कशा आल्या?" अशी विचारणा नातवाने केल्यानंतर त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. या प्रकरणी कृष्णा जाधव यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात संशयिताचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news