PWD appointment scam, junior clerks in trouble Arrest
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) बनावट नियुक्ती घोटाळ्यातील आरोपी कनिष्ठ लिपिक उज्वला अनिल नरवडे (४५) हिचा थेट सहभाग निष्पन्न झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर तिला २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अशी माहिती वेदांतनगर ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
२०१५ ते २०२५ या कालावधीत कार्यकारी अभियंत्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून तब्बल ३१ जणांना शिपाई, चौकीदार व सफाई कामगार अशा पदांवर बेकायदेशीररीत्या नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे व कनिष्ठ लिपिक उज्वला नरवडे यांनी संगनमताने कारस्थान रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नियुक्त्यांसाठी कोणतीही जाहिरात किंवा अधिकृत प्रक्रिया न राबवता थेट खोट्या नियुक्तीपत्रांचा वापर करून उमेदवारांना सेवा मिळवून देण्यात आली.