Sambhajinagar News : रुग्णांना वेळेत सुलभ आरोग्यसेवा द्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : रुग्णांना वेळेत सुलभ आरोग्यसेवा द्या

ईएसआयसी संचालकांचे निर्देश, स्वतंत्र सेवा खिडकीच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

Provide timely and accessible healthcare services to patients

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रुग्णांना वेळेत, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यात, यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश संचालक सोहम वायाळ यांनी राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधांच्या पाहणी दरम्यान दिले. रुग्णांसाठी स्वतंत्र सेवा खिडकी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला केली.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एफ. एल. पठाण उपस्थित होते. संचालक वायाळ यांनी रुग्णालयातील खाटांच्या डायलेसिस युनिटचीही पाहणी केली. येथील रुग्णांशी तसेच त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संवाद साधून रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या डायलेसिस सेवांबाबत त्यांचा अनुभव जाणून घेतला.

रुग्णालयातील दंत बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येचा आढावा घेतला. दंत विभागातील रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालयात लवकरच आणखी एक दंतचिकित्सा खुर्ची उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रुग्णांना रुग्णालयातील विविध सेवा अधिक सुलभतेने मिळाव्यात यासाठी स्वतंत्र सेवा खिडकी सुरू करण्याच्या सूचना संचालकांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT