Prisoner who escaped from court in handcuffs found at roadblock while travelling by rickshaw
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून हातकडीसह पसार झालेल्या आरोपीला नाकाबंदीत रिक्षातून पळून जाताना हसूल व वाहतूक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई सोमवारी (दि. २४) हर्सल टी पॉइंट येथे दुपारी पाचच्या सुमारास करण्यात आली. कारभारी श्यामलाल घुसिंगे (४५, रा. निधोना, फुलंब्री) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती हसूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, निधोना येथे २०२२ साली केलेल्या कारवाईत आर-ोपी घुसिंगेकडे गांजाची झाडे मिळून आली होती. त्या गुन्ह्यात वॉरंट बजावण्यात आल्याने त्याला सोमवारी फुलंब्री पोलिस ठाण्याचे जमादार दिलवाले दुपारी अटक करून सेशन कोर्टात घेऊन आले होते. मात्र, त्याने त्यांना गुंगारा देऊन हातकडीसह कोर्ट परिसरातून पलायन केले. दरम्यान, शहरात सर्व चौकांमध्ये रिक्षा चालकांची तपासणी मोहीम सुरू होती. त्याचवेळी
हसूल टी पॉइंट भागात एका रिक्षात आरोपी घुसिंगे बसलेला होता. त्याने शर्टच्या आतमध्ये हातकडी लपविल्याचे दिसून शाखेचे उपनिरीक्षक दीपक ढोणे, हर्मूल पोलिस ठाण्याचे रामेश्वर कदम, दिनेश पुसे यांनी त्याला पकडून चौकशी केली. तेव्हा तो हातकडीसह पळून आल्याचे समोर आले.
आरोपी कारभारी घुसिंगे येताच वाहतूक रिक्षाने फरार होऊन त्याचा भावाकडे जाऊन लपण्याचा डाव होता. सतर्क राहून आरोपीला पकडणारे उपनिरीक्षक दीपक ढोणे हे पोलिस महासंचालक पदक तसेच राष्ट्रपती पदक प्राप्त अधिकारी आहेत. दरम्यान, घुसिंगेला हसूल पोलिसांनी ठाण्यात नेले. त्यानंतर फुलंब्री पोलिसांना कळविण्यात आले. एपीआय मुहऱ्हाडे, सहायक फौजदार काळे, चाटे, दिलवाले यांनी हसूल ठाणे गाठून आरोपीला ताब्यात घेत फुलंब्री ठाण्यात नेले.