ST Bus Service : राखी पोर्णिमेनिमित्त एसटीच्या सेवेला प्राधान्य; कोटीचे उत्पन्न file photo
छत्रपती संभाजीनगर

ST Bus Service : राखी पोर्णिमेनिमित्त एसटीच्या सेवेला प्राधान्य; कोटीचे उत्पन्न

रक्षाबंधनाच्या दिवशी, शुक्रवारी (दि.२८) विविध मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

पुढारी वृत्तसेवा

Priority given to ST bus services for Rakhi Purnima; revenue runs into crores

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: रक्षाबंधनाच्या दिवशी, शुक्रवारी (दि.२८) विविध मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या प्रवासी वाहतुकीतून छत्रपती संभाजीनगर विभागाला तब्बल १ कोटी ४८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सणानिमित्त विविध मार्गावर प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसला प्राधान्य दिल्याने एका दिवसात दीड कोटींच्या जवळपास उत्पन्न झाल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.

रक्षाबंधनासाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांमुळे सिडको, मध्यवर्ती बसस्थानकासह विविध आगारांमध्ये शुक्रवारी मोठी गर्दी झाली होती. राखी, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन बहिणी माहेरच्या दिशेने रवाना झाल्या. तर अनेक भावांनी बहिणीकडे जाऊन राखी पोर्णिमा साजरी केली. ग्रामीण भागासह विविध मार्गावरील बसेसना प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिल्याने बस भरून धावत होत्या.

रक्षाबंधनासाठी गावी आलेले बहुतेक प्रवासी रविवारी गावाकडे परतत असल्याने, सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकासह विविध आगारांमध्ये परतीच्या दिवसांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दीच्या मार्गावर मागणीनुसार अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले असल्याने प्रवाशांना नियोजीत वेळेत घर जवळ करता आले.

रक्षाबंधनाचा सण आटोपल्यानंतर रविवारी (दि.३०) परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासांतील प्रवाशांमुळे शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानके अक्षरशः गजबजून गेली. सकाळपासूनच बसस्थानकांवर प्रवाशांची वर्दळ वाढली होती. रक्षाबंधनासाठी गावी आलेले नोकरदार, विद्यार्थी आणि कुटुंबे पुन्हा रवाना होत असल्याने विविध मार्गावरील बसेसना मोठी गर्दी झाली.

मध्यवर्ती बसस्थानकातील पुणे आणि जळगाव पाँईटवर प्रवाशांची विशेष गर्दी होती. तिकीट कक्षासमोर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बसस्थानक परिसरात सामानाच्या बॅगा घेऊन उभे असलेले प्रवासी आणि बस मिळविण्यासाठी सुरू असलेली धावपळ यामुळे सकाळपासूनच गर्दीचे वातावरण होते. दरम्यान, रक्षाबंधनाच्या परतीच्या गर्दीत श्रावणी सोमवारची भर पडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT